Tamannaah Bhatia Vijay Verma प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघंही एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते. मात्र आता या दोघांमधलं नातं संपुष्टात आलं असून त्यांनी फक्त चांगले मित्र म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती काही अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचं ब्रेक अप?

तमन्ना आणि विजय वर्मा यांच्या एका निकटवर्तीयाने इंडिया टुडे डिजिटलला सांगितलं की या दोघांचं ब्रेक अप झालं आहे. दोघांनी फक्त मैत्री कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाकी एकमेकांना डेट करणं थांबवलं असून प्रेमसंबंधही संपवले आहेत. लस्ट स्टोरीज २ या वेब सीरिजमध्ये या दोघांचा खूपच बोल्ड सीन होता. त्यावर चर्चाही सुरु झाल्या होत्या. ज्यानंतर या दोघांनीही म्हणजेच विजय वर्मा आणि तमन्नाने एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं होतं. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. तसंच पापाराझींना फोटोंसाठी पोजही द्यायचे. मात्र आता दोन वर्षांनी या दोघांचं नातं संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात याबाबत तमन्ना किंवा विजय वर्मा कुणीही भाष्य केलेलं नाही. आता हे नातं संपल्याची घोषणा तमन्ना आणि विजय वर्मा याबाबत अधिकृत घोषणा कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचं ब्रेक अप? (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

ब्रेक अपच्या या चर्चा नेमक्या का रंगल्या आहेत?

अनेक दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत होते. रिलेशनशीमध्ये आल्यानंतर हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपलं नातं फार काळ लपवून ठेवलं नव्हतं. हे दोघेही प्रेमात फार पुढे गेले असून लवकरच ते लग्न करणार आहेत, असंही म्हटलं होतं. तशी तयारीही चालू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता त्या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा म्हणजेच ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून सोबतचे फोटोही डिलीट केले आहेत. त्यामुळे या दोघांच्या ब्रेक अपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

लग्नाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच तमन्ना विजयच्या ब्रेक अपची चर्चा

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघंही मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पिंकव्हिला न्यूज या पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दोघंही एकमेकांपासून आठवड्याभरापासून वेगळे झाले आहेत. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांनी एकमेकांच्या इन्स्टाग्राम या अकाऊंटवरुन एकमेकांचे फोटो डिलीट केले आहेत. तमन्ना भाटियाचं स्त्री २ या चित्रपटातील आज की रात हे गाणं चांगलंच गाजलं. तसंच सिकंदर का मुकद्दर हा सिनेमाही काही दिवसांपूर्वीच रिलिज झाला होता. दरम्यान विजय वर्मा IC 814 द कंदहार हायजॅकमध्ये सीरिजमध्ये दिसला होता. दोन वर्षांपूर्वी विजय वर्मा आणि तमन्ना यांनी जेव्हा एकमेकांबरोबरचं नातं मान्य केलं तेव्हा त्यांच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण या दोघांचं नातं आता संपलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.