मागच्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया व अभिनेता विजय वर्मा यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही बऱ्याचदा एकत्र वेळ घालवताना दिसतात, कार्यक्रमांना हजेरीही लावतात. विजयला यावरून अनेकदा चिडवण्यात आलं होतं, पण तो नात्याबद्दल कधीच स्पष्टपणे बोलला नव्हता. अशातच आता तमन्नाने या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची पहिली भेट ‘लस्ट स्टोरीज २’ च्या सेटवर झाली होती. यात ते पहिल्यांदाच एकमेकांबरोबर काम करत आहेत. दरम्यान, गोव्यातील नवीन वर्षाच्या पार्टीनंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा चर्चेत आले. दोघांचा कथित किसिंगचा व्हिडिओ पार्टीतून व्हायरल झाला होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची सतत चर्चा होत होती. दोघे अनेकवेळा एकत्र दिसले, परंतु दोघांनीही यावर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
हेही वाचा – “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”
‘फिल्म कम्पॅनियन’शी बोलताना तमन्ना भाटिया म्हणाली, “विजय वर्माशी माझं आपोआप खूप छान बाँडिंग झालं. आयुष्यात खूप मेहनत करून यशस्वी झालेल्या महिलांची एक समस्या असते, ती म्हणजे आम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. पण काही गोष्टी सहज मिळाल्या की तुम्हाला प्रत्येक वेळी मेहनत करण्याची गरज नाही, हे लक्षात येतं. मैत्री खूप मोठी गोष्ट आहे कारण, एका मित्राबरोबरच तुम्हीही किती जोरात असू शकता, एखाद्या प्राण्यासारख्या आवाजातही तुम्ही कोणताही विचार न करता हसू शकता. विजय वर्माची मला मनापासून काळजी वाटते. तो माझं हॅप्पी प्लेस आहे.”
तमन्ना पुढे म्हणाली, “भारतात अशीही एक समस्या आहे की एका मुलीला जोडीदारासाठी तिचं संपूर्ण आयुष्य बदलावे लागते. त्या माणसासाठी तुम्हाला खूप गोष्टी कराव्या लागतात. पण विजय वर्मा तसा नाही. तो माझं आयुष्य आणि माझ्या गोष्टी पूर्णपणे समजून घेतो.”