बॉलीवूड अभिनेत्री आणि काजोलची बहिण तनिषा मुखर्जी सध्या चर्चेत आहे. अनेकदा या दोन्ही बहिणींच्या करिअरच्या बाबतीत तुलना केली जाते. तनिषाने २००३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘श्शsss’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण काजोलच्या पहिल्या चित्रपटाइतका तनिषाचा चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नाही. तनिषाने नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीदरम्यान काजोल आणि तिच्यामध्ये होणाऱ्या तुलनेबाबत भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तनिषा म्हणाली, “या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी माझ्या बहिणीकडे पाहून कधीच माझी तिच्याशी तुलना करत नाही. मी तर स्वतःची तुलना इतर अभिनेत्रींशीही करत नाही, तर माझ्या बहिणीशी का करेन? प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा एक प्रवास असतो, असं मला वाटतं. माझं करिअर माझ्या बहिणीएवढं चांगलं नाहीय हे मी मान्य करते. तिने तिच्या करिअरची सुरूवात ती १६ वर्षांची असताना केली. खरंतर ती इंडस्ट्रीत होती म्हणून मला खूप विशेषाधिकार मिळाले. मला जे काही आवश्यक होतं ते दिल्याबद्दल मी तिच्या करिअरचे आभार मानते.”

हेही वाचा… “काकाच जास्त एन्जॉय…”, ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी तेलुगू गाण्यावर केला हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

तनिषा पुढे म्हणाली, “शेवटी, माझं करिअर खूप आरामदायक होतं. मला जास्त काम करावं लागलं नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी कधीही माझी तुलना तिच्याबरोबर करत नाही. मला वाटतं की जगाला तुलना करणं आवडतं, आणि मी त्या जगात राहत नाही.”

तनिषा तिच्या आणि काजोलच्या बालपणीच्या आठवणी सांगत म्हणाली, “काजोल एक खोडकर मुलगी होती. माझ्यामुळे ती खूप अडचणींमध्ये सापडायची. आम्ही लहान असताना खूप भांडायचो. माझे बाबा आम्हाला टॉम आणि जेरी म्हणायचे.”

हेही वाचा… “काकाच जास्त एन्जॉय…”, ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी तेलुगू गाण्यावर केला हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

तथापि, तनिषाने हे देखील उघड केलं की काजोलने खूप कमी वयात सगळ्या जबाबदार्या स्वीकारल्या. तनिषा म्हणाली, “माझी आई आणि मी आम्ही दोघी मैत्रीणींसारख्या आहोत आणि आमची आई काजोल आहे. ती आमच्यात स्ट्रीक्ट आहे. ती खरंतर आमच्याशी आईसारखीच वागते.”

दरम्यान, काजोल आणि तनिषा या दिग्गज स्टार तनुजा आणि दिग्दर्शक, लेखक तसेच निर्माते शोमू मुखर्जी यांच्या मुली आहेत. सध्या, तनिषा तिच्या ‘वीर मुरारबाजी’ या मराठी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटाचं हिंदी आणि मराठीत एकाच वेळी शूट करण्यात आलं आहे. तनिषाने ‘अंतर’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘वीर मुरारबाजी’ हा चित्रपट रणधुरंधर नरवीर मुरारबाजी यांच्या जीवनावर आधारित आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanishaa mukerji on comparison between her and kajol in career dvr