तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीबरोबर एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात तिने व आदिलने राखी सावंतवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता तनुश्रीने राखीविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘मीटू’ प्रकरणादरम्यान राखी सावंतने तनुश्रीवर खालच्या स्तरावर टीका केली होती. यााबत आता तनुश्रीने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

तनुश्री म्हणाली, “मी टू चळवळीदरम्यान २०१८ मध्ये राखी सावंत मुळे झालेल्या मानसिक आघाताविरोधात मी येथे एफआयआर दाखल करण्यासाठी आले आहे. अनेक कारणांवर आधारित एफआयआरमध्ये अनेक कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिने माझ्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक विधानाची मी नोंद केली आहे. यावेळी तिला सोडणार नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, पोलीस लवकरच कारवाई करतील आणि मी त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.” यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय.

“ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…”

तनुश्रीने घडलेला प्रसंग सांगितला. “हॉर्न ओके प्लीज चित्रपटादरम्यान, निर्मात्यांनी सर्वात आधी राखीच्या जागी मला घेतलं. पण माझा नाना पाटेकरांशी वाद झाला अन् त्यानंतर त्यांनी पुन्हा राखीला घेतलं. हे सगळं नियोजित होतं. माझ्या नावाचा वापर करून चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं. त्यांनी माझे सर्व चेक बाऊन्स केले. या नियोजित कटाचा राखी एक भाग होती,” असं तनुश्रीने म्हटलं आहे.

“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”

या संपूर्ण घटनेचा आपल्यावर खूप परिणाम झाला, असं तिने सांगितलं. “राखीमुळे मला खूप भावनिक आणि मानसिक आघाताचा सामना करावा लागला. तिने माझ्याबद्दल अशा भयंकर गोष्टी पसरवल्या, ज्या मी सहन करू शकले नाही. ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी ड्रामा करते. तिने स्वतःच्या फायद्यासाठी माझी प्रतिमा खराब केली. ती माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच काही बोलली. तिच्यामुळे माझं लग्न होऊ शकलं नाही. तिने मला खूप दिवस त्रास दिला,” असे आरोप तनुश्रीने केले.

२०१८ मध्ये हे सगळं घडलं मग आता पाच वर्षांनी तक्रार का करत आहेस असं तनुश्रीला विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “मी २००८ आणि २०१८ मध्येही नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राखीने माझे व्हिडीओ प्रसारित केल्याने आणि खालच्या पातळीवर टीका केल्याने माझं मनोबल खचलं. पण आता मी तिला घाबरणार नाही. आता मी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. राखीने माझ्याबरोबर केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिला शिक्षा होईल याची खात्री मी करेन. पूर्वी मी तिच्या आक्रमकतेला सामोरे जाऊ शकत नव्हते पण यावेळी मी तिला सोडणार नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanushree dutta files fir against rakhi sawant recalls issue with nana patekar at movie set hrc