दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्या आरोपांवर नाना यांनी त्यांची बाजू मांडली. त्यानंतर आता तनुश्री दत्ताने त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर खोटारडे आहेत, असं तनुश्रीने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाना पाटेकर काय म्हणाले होते?

तनुश्रीने केलेल्या आरोपांमुळे राग आला होता का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना ‘द लल्लनटॉप’ला मुलाखतीत विचारण्यात आला. “मला या गोष्टीचा राग आला नाही कारण हे सर्व आरोपच खोटे आहेत. मला या आरोपांमुळे काहीच फरक पडला नाही. कारण काही घडलंच नव्हतं. काही झालं असतं तर सांगितलं असतं. अचानक कोणीतरी म्हणतं की तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. मी तसं काहीच केलेलं नाही याशिवाय मी वेगळं काय बोलू शकतो,” असं नाना पाटेकर म्हणाले.

तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”

तनुश्री दत्ता काय म्हणाली?

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली, “आता ते घाबरले आहेत, कारण त्यांचे बॉलीवूडमधील समर्थक कमी झाले आहेत. ज्यांनी त्यांना त्यावेळी पाठिंबा दिला ते सर्व एकतर दिवाळखोर आहेत किंवा त्यांना साइडलाइन करण्यात आलं आहे. नाना जे बोलतात त्यावर लोक फार लवकर विश्वास ठेवतात, त्यामुळे आता त्यांनी पुन्हा एकदा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. नाना तद्दन खोटारडे आहेत.” तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

तनुश्री दत्ताने काय आरोप केले होते?

तनुश्री दत्ताने २०१८ साली अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला होता. मात्र, नाना यांनी हे सर्व आरोप नाकारले होते. २००८ साली हे घडल्याचं तनुश्रीने म्हटलं होतं. त्या दिवशी सेटवर ५० लोक होते असं नाना पाटेकर म्हणाले होते. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपासंदर्भात कोणतेही पुरावे न मिळाल्याने मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर यांची या आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली होती. मात्र त्यानंतरही अनेक ‘मी टू’ मोहिमेचा उल्लेख करत तनुश्री नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलत असते.