तनुश्री दत्ता व इमरान हाश्मी यांनी ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटात दिलेल्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली होती. या दोघांनी भरपूर बोल्ड व रोमँटिक सीनही दिले होते. त्यांनी ‘आशिक बनाया आपने’, ‘चॉकलेट’, ‘गूड बॉय बॅड बॉय’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. यामध्ये ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातील गाणं खूप गाजलं होतं.

तनुश्री दत्ता आणि इमरान हाश्मीचे किसिंग सीन खूप चर्चेत होते. अभिनेत्री ‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “माझ्यासाठी इमरान पहिल्या दिवसापासून नेहमीच एक अभिनेता होता. मी त्याच्यासोबत तीन चित्रपट केले. आम्ही ‘चॉकलेट’मध्येही किसिंग सीन शूट केले, पण निर्मात्यांनी ते सीन ठेवले नाही. पहिल्यांदा किस करताना खूप विचित्र वाटलं होतं. पण दुसऱ्यांदा तितकं विचित्र वाटलं नाही. कारण खऱ्या आयुष्यात आमची एकमेकांशी कोणतीही केमिस्ट्री नाही. इमरानची किसर-बॉय अशी प्रतिमा आहे, परंतु तो सर्वात कंफर्टेबल किसर नाही आणि मीही नाही.”

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

“मी त्याच्याबरोबर बसून…”, घटस्फोटाच्या १३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायची इच्छा

दरम्यान, या सीनबद्दल कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दलही तनुश्रीने एकदा भाष्य केलं होतं. “पहिले दोन दिवस तर त्यांना काहीच कल्पना नव्हती, त्यामुळे माझं त्यांच्याशी काहीच बोलणं झालेलं नव्हतं. मी त्यांना याबाबत काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा त्यांना ही गोष्ट कालांतराने समजली तेव्हा त्यांनी अगदी सहज ही गोष्ट स्वीकारली,” असं तनुश्री म्हणाली होती.

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

यावेळी तिने शूटिंग करताना सेटवर कसं वातावरण होतं, याचाही खुलासा केला होता. “तो सीन संपूर्ण क्रूसमोर चित्रित झाला होता, पण सेटवर कोणालाच काही फरक पडला नाही. नंतर मलाही त्याची सवय झाली. सेटवरील लोक त्यांच्या कामात व्यग्र होते. लोकांसाठी ही गोष्ट फार मोठी असते. पण हा सगळा कॅमेरासमोरचा खेळ असतो आम्ही फक्त आमचं काम करत असतो,” असं तनुश्रीने सांगितलं होतं.

Story img Loader