‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री तनुश्री दत्ता गेली १२ वर्ष सिनेसृष्टीपासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणूकीचे आरोप केले होते ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. आता पुन्हा राखी सावंतवर भाष्य केल्याने तनुश्री पुन्हा चर्चेत आली आहे.
मध्यंतरी ‘मी टू मुव्हमेंट’दरम्यानही तनुश्रीने राखीवर चांगलीच टीका केली होती. तनुश्रीला ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटामुळे आणि त्यातील बोल्ड इंटीमेट सीनमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात तिने इम्रान हाशमीबरोबर एक जबरदस्त हॉट इंटीमेट सीन दिला ज्याची खूप चर्चा झाली. आजही इंटीमेट सीन म्हंटलं की कित्येकांच्या डोळ्यासमोर हाच सीन उभा राहतो. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तनुश्रीने या किसिंग सीनबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : २५० चित्रपट करूनही ६९ व्या वर्षी अभिनेते टिकू तलसानिया कामाच्या शोधात; म्हणाले, “मी बेरोजगार…”
हा सीन करताना नेमकी तनुश्रीची मनस्थिति कशी होती, तो सीन नेमका कसा चित्रित करण्यात आला? शिवाय तो सीन पाहिल्यावर तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती याबद्दल तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे. ‘आज तक’च्या रिपोर्टनुसार तनुश्री म्हणाली, “याआधीसुद्धा मी इम्रानबरोबर ‘चॉकलेट’ चित्रपटात एक लिपलॉक सीन दिला होता, परंतु नंतर तो चित्रपटातून वगळण्यात आला होता. ‘आशिक बनाया आपने’मध्ये एक पूर्ण इंटीमेट सीन चित्रीत करायचा होता अन् मी चांगलीच अस्वस्थ होते.”
पुढे तनुश्री म्हणाली, “तो सीन चित्रपटाच्या संपूर्ण क्रूसमोर चित्रित झाला होता, पण सेटवर कोणालाच काही फरक पडला नाही. नंतर मलाही त्याची सवय झाली. सेटवरील लोक त्यांच्या कामात व्यस्त असतात, तिथे माझा एक बॅकलेस सीन शूट होत होता तर बाकीचे लोक त्यांच्या कामात मग्न होते. लोकांसाठी ही गोष्ट फार मोठी असते. खऱ्या आयुष्यात आमचं नातं एका भावा-बहिणीसारखं असतं. हा सगळा कॅमेरासमोरचा खेळ असतो आम्ही फक्त आमचं काम करत असतो.”
याबरोबरच हा सीन पाहिल्यावर तनुश्रीच्या आई-वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दलही अभिनेत्रीने खुलासा केला आहे. तनुश्री म्हणाली, “पहिले दोन दिवस तर त्यांना काहीच कल्पना नव्हती, त्यामुळे माझं त्यांच्याशी काहीच बोलणं झालेलं नव्हतं. मी त्यांना याबाबत काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा त्यांना ही गोष्ट कालांतराने समजली तेव्हा त्यांनी अगदी सहज ही गोष्ट स्वीकारली.”