बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या करिअरमध्ये काही चित्रपट केले ज्याद्वारे त्यांना वेगळी ओळख मिळाली. पण, ते जास्त काळ इंडस्ट्रीत टिकू शकले नाहीत आणि त्यांनी हे क्षेत्र सोडलं. मराठमोळी तारा देशपांडे ही देखील अशीच एक अभिनेत्री आहे जिने १९९६ साली आपल्या करिअरची सुरुवात केली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टाइल’ या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. मात्र, आता ती या क्षेत्रापासून खूप दूर गेली असून केटरिंग व्यवसाय चालवत आहे.
तारा एकेकाळी सिनेसृष्टीत सक्रिय होती. पण, आज ती अभिनय सोडून कूक बनली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि रोज नवनवीन रेसिपी शेअर करत असते. अनेक लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. एकेकाळी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून झळकलेल्या ताराला आता स्वयंपाकाच्या व्हिडीओत पाहून ओळखणं आता खूप कठीण झालं आहे.
‘स्टाईल’ चित्रपटात ताराने निक्की मल्होत्राची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतरही ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. मात्र तिला अभिनयाच्या दुनियेत आपलं स्थान निर्माण करता आलं नाही. प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ताराला यश आलं नाही, त्यामुळे तिने अभिनय क्षेत्राला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. मग ती अभिनयाच्या दुनियेतून गायब झाली आणि आता कूक म्हणजेच स्वयंपाकी बनली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याने केलं अरेंज मॅरेज, सात वर्षांनी लहान आहे पत्नी, लग्नाचे फोटो आले समोर
तारा देशपांडे आता भारतात राहत नाही, अमेरिकन व्यक्तीशी लग्न केल्यानंतर ती बोस्टनला शिफ्ट झाली आहे. तिच्या पतीने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. आता तारा बोस्टनमध्ये स्वतःची केटरिंग एजन्सी चालवत आहे.