बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. व्हीएफएक्स व इतर वादांमुळे दोनदा टीझर व ट्रेलरमध्ये बदल करण्यात आले. शिवाय चित्रपटाचं प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर अखेरीस १६ जून रोजी चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र तरीही प्रेक्षकांची निराशा झाल्याचं दिसतंय. इतकंच नव्हे तर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा चित्रपट निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे.

“आदिपुरुष हा एक निराशाजनक चित्रपट आहे. तो आपल्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करत नाही. दिग्दर्शक ओम राऊतकडे एक स्वप्नवत स्टारकास्ट (दिग्गज कलाकारांची फौज) आणि प्रचंड मोठं बजेट होतं, पण त्याचा वापर करून त्याने फक्त गोंधळ निर्माण केला आहे,” असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलंय. त्यांनी चित्रपटाला फक्त अर्धा स्टार रेटिंग दिलंय. याबरोबरच ‘फिल्मी फिवर’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या चित्रपटावर टीला केली आहे अन् बॉलिवूडला खडेबोल सुनावले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : Adipurush Review : VFX चा अतिरेक अन् सिनेमॅटीक लिबर्टीचा ओव्हरडोस; ‘आदिपुरुष’ पाहून तुम्हीही म्हणाल हे प्रभू!

या मुलाखतीमध्ये तरण आदर्श म्हणाले, “जेव्हा तुम्ही रामायण मोठ्या पडद्यावर पाहता तेव्हा ते गांभीर्य आणि सचोटीने पाहायला मिळावं अशी तुम्ही अपेक्षा करता अन् ती रास्त आहे. मी हा चित्रपट पाहून फार अस्वस्थ झालो. ट्रेलरपासूनच मी या चित्रपटाबद्दल साशंक होतो. मी स्वतः ओम राऊत आणि प्रभास यांच्याजवळ माझी नाराजी व्यक्त केली होती. हा चित्रपट पाहून मला प्रचंड दुःख झालं. रामायणाची यात खिल्ली उडवली गेली आहे. सैफ अली खानचा लूक, डायलॉग. लंकेचं चित्रण सगळंच निराशाजनक आहे.”

पुढे ते म्हणाले, “यासाठीच बॉलिवूड बदनाम आहे. ‘आदिपुरुष’ सारख्या चित्रपटांमुळेच आज लोक कुटुंबासह चित्रपटगृहात यायचं टाळत आहेत. यामुळेच चित्रपट फ्लॉप होत आहेत अन् लोक सडकून टीका करत आहेत. आदिपुरुषसारखा चित्रपट सादर करून यांना काय साध्य करायचं आहे. याला विरोध होणं स्वाभाविक आहे. तुम्ही रामायणसुद्धा इमानदारीने सादर करू शकत नाहीत याला काय म्हणायचं?” दरम्यान, या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे.

Story img Loader