बॉलिवूडचा भाईजान सलमान खान तब्बल ३ वर्षांनी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातील गाणीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल आणि त्यातील सलमानच्या भूमिकेबद्दल नुकतंच सिनेतज्ञ आणि समीक्षक तरण आदर्श यांनी भाष्य केलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तरण आदर्श यांनी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलरवर परखड मत व्यक्त केलं आहे. याबरोबरच सलमानची कोणती गोष्ट त्यांना खटकते आणि कोणती गोष्ट त्यांना आवडते याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. या मुलाखतीतून सलमानच्या चित्रपटाबद्दल भाष्य करताना त्यांनी सलमानला एक चांगला सल्लादेखील दिला आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

आणखी वाचा : रणवीर सिंगच्या अभिनय कारकिर्दीला लागणार ब्रेक; YRF ने सोडली साथ, अभिनेत्यासह चित्रपट करण्यास नकार

मुलाखतीदरम्यान तरण आदर्श म्हणाले, “किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरविषयी माझ्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय की रोमान्स करणारा सलमान खान मला आवडत नाही. तो अॅक्शनमध्ये जास्त शोभून दिसतो. सलमानचे ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ हे चित्रपट मला प्रचंड आवडतात कारण त्यात सलमानची एक वेगळी बाजू बघायला मिळते, पण रोमान्समध्ये सलमान फिका पडतो हे नक्की. त्याने योग्य चित्रपट आणि दिग्दर्शक निवडायला हवेत असं मला वाटतं.”

आणखी वाचा : गाण्यातील महिलांविषयी अपमानास्पद शब्दांबद्दल हनी सिंगचं स्पष्टीकरण; रॅपर म्हणतो, “असं असेल तर…”

सलमानबद्दल बोलताना त्यांनी ‘किसी का भाई किसी की जान’च्या बॉस ऑफिस नंबर्सबद्दलही भाष्य केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमानसह पूजा हेगडे, वेंकटेश, शेहनाज गिल, पलक तिवारी, जगपती बाबू हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader