सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांच्या चर्चा आहेत. एकीकडे अनेक चित्रपटांची चित्रीकरणं सुरू आहेत, तर दुसरीकडे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आता या सगळ्यामध्ये जान्हवी कपूरचा ‘मिली’ चित्रपट जबरदस्त चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर आज प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून तिचे चाहते या चित्रपटासाठी फार उत्सुक झालेले दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘ढोंगी’ म्हणत नेटकऱ्यांनी घेतली अक्षय कुमारची शाळा, व्हायरल व्हिडीओमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा

सत्य घटनेवर आधारित जान्हवी कपूरच्या ‘मिली’ चित्रपटाचा टीझर ४८ सेकंदांचा आहे. या चित्रपटात जान्हवी ‘मिली नौटियाल’ या नर्सिंग ग्रॅज्युएटची भूमिका साकारत आहे. या टीझरमध्ये जान्हवी एका फ्रीजिंग रूममध्ये अडकलेली दिसत आहे. ती या खोलीतून बाहेर पडण्याचा ती अतोनात प्रयत्न करत आहे पण तिला ते सहज शक्य होत नाहीये. जीवघेण्या थंडीपासून वाचण्यासाठी ती स्वत:भोवती प्लॅस्टिक आणि टेप गुंडाळत आहे. तसेच खोलीतील तापमान वाढवण्यासाठी ती विविध गोष्टी आजमावून बघतेय. तसेच ती दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे.

या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केलेली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी पहिल्यांदाच तिच्या वडिलांची निर्मिती असलेल्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले असून या चितरपटाचे संगीत ए. आर. रहमान यांचे आहे. पुढील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.