शाहरुख खान आणि सलमान खान ही बॉलिवूडमधील दोन मोठी नावं. आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या दोन्ही खान्सची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या दोघांच्या आगामी चित्रपटांकडे कायमच प्रत्येकाचं लक्ष असतं. सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात, तर शाहरुख खान ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. अशातच यांच्या चाहत्यांसाठी एक उत्कंठावर्धक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, पाहिल्यांदाच शाहरुख आणि सलमान यांच्यात टक्कर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : थिएटरमध्ये फ्लॉप पण ओटीटीवर हिट; ‘लाल सिंग चड्ढा’चे नाव सर्वोत्कृष्ट १० नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या यादीत सामील

शाहरुख खान आणि सलमान खान गेले अनेक दिवस त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलच्या काही ना काही बातम्या शेअर करून चाहत्यांमधली उत्सुकता वाढवत आहेत. या दोघांच्याही आगामी चित्रपटांच्या सेटवरून काही बिहाईंड द सीन्स फोटो व्हायरल झाले होते. तसंच आपापल्या चित्रपटातील त्यांचे लुक्सही आउट झाले. त्यांच्या लुक्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आता सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या टीझरच्या तारखा समोर आल्या आहेत.

यंदाची दिवाळी शाहरुख आणि सलमानच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे कारण, ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांचे पहिले टीझर या दिवाळीत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांचे टीझर एकाच दिवशी, म्हणजे २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या शाहरुख आणि सलमानमची टक्कर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : आज कोटींच्या घरात फी आकारणाऱ्या बॉलिवूड स्टार्सना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तर शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. शाहरुखबरोबर या चित्रपटात जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे सलमानच्या आगामी चित्रपटाचे नाव आधी ‘कभी ईद कभी दिवाली’ असे होते. ते नाव बदलून चित्रपटाचे नाव आता ‘किसी का भाई.. किसी की जान’ असे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teasers of kisi ka bhai kisi ki jaan and pathaan will be out on 23 october rnv