ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगत आहे. अखेरीस हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. याचबरोबरीने या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा रंगत आहे. ती अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजस्विनीने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. शूर्पणखाची भूमिका तिने या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर साकारली. शूर्पणखा ही सगळ्यांनाच अक्राळविक्राळ राक्षसी म्हणून माहीत आहे. हिच भूमिका तेजस्विनीच्या वाट्याला आली. ती तिने उत्तमरित्या साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा – Adipurush Review : VFX चा अतिरेक अन् सिनेमॅटिक लिबर्टीचा ओव्हरडोस; ‘आदिपुरुष’ पाहून तुम्हीही म्हणाल हे प्रभू!

‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर तेजस्विनीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिने आता इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच आयुष्यात न केलेल्या गोष्टी चित्रपटात करायला मिळाल्या असल्याचं तेजस्विनीने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहतेमंडळींनीही कमेंट केली आहे.

आणखी वाचा – Video : ‘आदिपुरुष’चा शो सुरु असताना थिएटरमध्ये माकडाची एन्ट्री, प्रेक्षकांची आरडाओरड अन्…; पुढे काय घडलं पाहा

आणखी वाचा – प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनच्या नात्याबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला कळालं होतं अन्…; म्हणाल्या, “कल्पना होती पण…”

तेजस्विनी म्हणाली, “जे आयुष्यात कधी केलं नाही ते चित्रपटामध्ये करुन घेतलं. म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये. मला ‘आदिपुरुष’मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत पाहा”. स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, पल्लवी पाटील, राधा सागर सारख्या कलाकारांनी तेजस्विनीच्या या पोस्ट कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejaswini pandit play shurpankha in prabhas adipurush movie actress share post on instagram see details kmd