आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. कधी लूकमुळे तर कधी अभिनय, चित्रपट यामुळे, सध्या एकाच अभिनेत्रीची चर्चा आहे ती अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंगने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने आपल्या करियरची सुरवात दाक्षिणात्य चित्रपटांपासून केली आहे. २०१४ साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. रकुल सोशल मीडियावर तसेच माध्यमांमध्ये सक्रीय असते.

नुकतीच तिने इंडिया टुडेच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात तिला विचारले की, “यावर्षी तुझे ५ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तू अक्षय कुमारला टक्कर देत आहेस का? यामागे नेमकं कारण काय? महामारी असू शकत का?” रकुलने हसत उत्तर दिले, “मला खूप आनंद होत आहे इथे येऊन, कोणत्याच अभिनेत्याला असं वाटत नाही त्याचे एकापाठोपाठ एक १० दिवसात चित्रपट प्रदर्शित व्हावे, माझे ‘डॉक्टर जी’ आणि ‘थँक गॉड’ हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झालेत, महामारीच कारण असू शकत कारण अनेक चित्रपट रखडले होते. त्याकाळात चित्रपटगृह बंद होती. त्यामुळे मला असं वाटतं हे कारण असू शकतं. मला हे अनेकजण म्हणाले आहेत अक्षय कुमारशी स्पर्धा करत आहेस का? मी त्यांना सांगते मला यासाठी खूप काम करावं लागणार आहे.”

“अनुपम यांना जास्त….”; कपिल शर्माच्या कार्यक्रमात नीना गुप्तांनी अभिनेत्यावर साधला निशाणा

रकुल प्रीत नुकतीच ‘डॉक्टर जी’ आणि ‘थँक गॉड’, ‘रनवे ३’४ चित्रपटात दिसली होती मात्र हे चित्रपट फारसे चालेले नाहीत. त्याचबरोबरीने तिने ‘अटॅक’, ‘शिमला मिरची’, ‘मरजावा’ ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात काम केले आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केलं होत.

रकुल मूळची दिल्लीची असून मॉडेलिंग क्षेत्रापासून तिने आपल्या करियरची सुरवात केली आहे. तिने गणित विषयातून पदवी संपादन केली आहे. आताती ‘इंडियन २’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thank god actress confessed that she is not giving any competiton to akshay kumar in films spg