बॉयकॉट ट्रेंड, दाक्षिणात्य चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा यामुळे बॉलिवूड इंडस्ट्री संपली अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. प्रेक्षकांनीदेखील बॉलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र चित्रपट बॉक्सऑफिसवर आलेला ‘विक्रम वेधा’, ‘थँक गॉड’, ‘डॉक्टर जी’ हे चित्रपट फारसे चालले नाहीत. त्यामुळे बॉलिवूड संपले अशी चर्चा सगळीकडे सुरु असताना यावर अभिनेत्री रकुल प्रीतने भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रकुल नुकतीच इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात उपस्थित होती. तेव्हा ती बॉलिवुडविषयी बोलताना असं म्हणाली “हा सध्या एक टप्पा आहे. जे चालत नाही त्यावर लोकांना लिहायला आवडत असते. मात्र यामागे खूप मेहनत घ्यावी लागत असते. आपण ज्या दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलत आहोत जे इथे प्रदर्शित होत आहेत आणि हिट होत आहेत. बाकीचे इथे प्रदर्शित होत नाहीत आणि चालत ही नाही. महामारीनंतर प्रेक्षकांची आवड बदलली आहे. हे फक्त दाक्षिणात्य आणि बॉलिवूडबद्दल नसून लोकांना आता लार्जर दॅन लाईफ चित्रपटाची गरज आहे.”

“एकामागोमाग एक चित्रपट करून अक्षय कुमारबरोबर स्पर्धा करतेस का?” रकुल प्रीत म्हणाली…

मध्यंतरी तिने बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केले होते. रकुल नुकतीच थँक गॉड, डॉक्टरजी चित्रपटात दिसली होती, या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. रकुलने २००९ मध्ये कन्नड चित्रपट ‘गिली’मधून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर अनेक तेलुगू, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१४ साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

रकुलने वयाच्या १८ वर्षी करियरला सुरवात केली. मॉडेलिंग ते अभिनय असा तिचा प्रवास आहे. रकुल मूळची दिल्लीची आहे . तिने गणित विषयातून पदवी संपादन केली आहे. आताती ‘इंडियन २’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिसणार आहे