गेले काही दिवस बॉलिवूड चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिसवर जोर धरू लागले आहेत, पण याआधीची काही वर्षं आणि खासकरून कोविड दरम्यानचा काळ हा बॉलिवूडसाठी खडतर होता. मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट दणकून आपटले. अगदी आमिर खान, अक्षय कुमारपासून अगदी अमिताभ बच्चनपर्यंत कित्येक स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. शाहरुख खानने ‘पठाण’मधून दमदार कमबॅक केले, पण ४ वर्षांपूर्वी शाहरुखचे आलेले तीनही चित्रपट जबरदस्त फ्लॉप ठरले होते.

आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आजवर सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत आणि तरी आज त्याची गणती टॉपच्या स्टार्समध्ये होते. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेद्र किंवा जितेंद्रसारख्या दिग्गजांनीसुद्धा त्यांच्या करिअरमध्ये बरेच फ्लॉप चित्रपट दिले. गेला बाजार मिथुन चक्रवर्तीसारख्या अभिनेत्याच्या नावावरही तब्बल १८० फ्लॉप चित्रपट आहेत. पण आजवर कैक निर्मात्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान करणारा तो सुपरस्टार दूसरा तिसरा कुणी नसून अक्षय कुमार आहे.

imdb all time favourite 250 indian movie
IMDb ने जाहीर केली आजवरच्या सर्वोत्तम २५० भारतीय चित्रपटांची नावे, 12th फेल पहिल्या क्रमांकावर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन
pedro almodovar loksatta latest marathi news
बुकबातमी: पेद्रो अल्मोदोव्हर कथा लिहितो….
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
abhijeet kelkar post on aarya slapped nikki tamboli
“…ते तुला नक्की एक संधी देतील”, निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने दिला ‘हा’ सल्ला

आणखी वाचा : बहुचर्चित ‘मेड इन हेवन २’चा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी उलगडणार गुंतलेल्या नात्यांच्या हृदयस्पर्शी गोष्टी

अक्षय कुमारने त्याच्या संपूर्ण करीअरमध्ये ५७ फ्लॉप चित्रपट दिले आहेत, ज्यात त्यांचे नुकतेच फ्लॉप झालेले ६ चित्रपटही सामील आहेत.’डीएनए’न्यूजच्या रीपोर्टनुसार चित्रपटसृष्टीतील काही खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयच्या या ५७ फ्लॉप चित्रपटांचं एकूण नुकसान हे जवळपास १००० कोटींच्या आसपास आहे. यापैकी ४०० कोटींचं नुकसान हे गेल्या काही वर्षातील फ्लॉप चित्रपटांमुळे झाल्याचंही समोर आलं आहे.

अक्षयच्या फिल्मी करिअरमध्ये ५७ फ्लॉप चित्रपट आहेत अन् ४२ हिट चित्रपट आहेत. या आकड्यांनुसार अक्षयचा चित्रपट हीट होण्याची सरासरी बॉलिवूडच्या तीन खान मंडळींच्या एकत्रित सरासरीपेक्षाही कमीच आहे. एकेकाळी भारतात सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता म्हणून ओळखला जाणाऱ्या सुपरस्टारच्या नावावर ५७ फ्लॉप चित्रपट आहेत अन् यामुळे सर्व निर्मात्यांना मिळून १००० कोटींचं नुकसान झालं आहे. तरीही अक्षय कुमार हे नाव आजही तितकंच लोकप्रिय आहे आणि आजही अक्षयकडे कामाची अजिबात कमतरता नाही, विचित्र वाटत असली तरी ही वस्तुस्थिती आहे.