अभिनेत्री करीना कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. करीनाच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा ऐकायला मिळत आहे. दिग्दर्शित ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं. चित्रपटात करीना कपूर एका महिला गुप्तहेराची भूमिका साकारत आहे, तिचे नाव जस भामरा आहे. रविवारी ‘लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२३’ मध्ये या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.

हेही वाचा- ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’च्या शूटींगला सुरुवात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणार

gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
ed to probe actors in forex trading app fraud case
मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंग ॲप फसवणूक प्रकरण ईडीकडून कलाकारांची चौकशी
actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी
Ranveer Singh
कल्की चित्रपट पाहिल्यानंतर रणवीर सिंह पत्नी दीपिकाच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “त्या प्रत्येक क्षणाला…”
Jasprit Bumrah's Emotional Childhood story
‘बुमराहची आई १६-१८ तास काम करायची…’, एका पोस्टने उलगडले जसप्रीतच्या आयुष्यातील सर्वात मोठे भावनिक क्षण
Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुळजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?
Marathi Film Festival during July 2728 in California
कॅलिफोर्नियामध्ये २७२८ जुलै दरम्यान मराठी चित्रपट महोत्सव
chhaya kadam felicitated at cannes festival
कान महोत्सव गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांचा सत्कार

‘द बकिंगहॅम मर्डर्स’मधून करीना कपूर खान निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटात करीनबरोबर अॅश टंडन, रणवीर ब्रार आणि कीथ अॅलन यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे, तर कथा असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कर यांनी लिहिली आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि टीबीएम फिल्म्सने शोभा कपूर, एकता कपूर आणि करीना कपूर खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी करीना कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत ‘द बकिंघम मर्डर्स चित्रपटाबद्दल आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती दिली होती. करीना लिहिले होते, ‘हे एक असे पात्र आहे ज्याची मी गेल्या २३ वर्षांपासून वाट पाहत होते. डिटेक्टिव्ह मालिका प्रकार मला नेहमीच आवडतो. ‘करमचंद’पासून ‘प्राइम सस्पेक्ट’मधील हेलन मिरेनपर्यंत, ‘अगाथा क्रिस्टी’मधील हरक्यूल पॉइरोटपासून ‘मेरे ऑफ ईस्टटाऊन’मधील केट विन्सलेटसारखे चित्रपट मी पाहिले आहे. मलाही अशीच एक गुप्तहेर स्त्री बनण्याची इच्छा होती.”