The Buckingham Murders Trailer : करीना कपूर खानची मुख्य भूमिका असलेला ‘द बकिंघम मर्डर्स’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला आणि एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. करीना यात मर्डर मिस्ट्री सोडवताना दिसेल. बेबोच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून ‘द बकिंघम मर्डर्स’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करीना कपूर खान या ‘द बकिंघम मर्डर्स’ ( The Buckingham Murders ) चित्रपटात एका लहान मुलाच्या खूनाचा शोध घेताना दिसेल. बेबो या चित्रपटात जसप्रीत भामराची भूमिका साकारणार आहे. एका लहान मुलाच्या खूनाचा तपास करण्यासाठी करीनाला नियुक्त करण्यात येतं. आता ती गुन्हेगारापर्यंत कशी पोहोचणार? आणि हा शोध घेताना तिला किती अडचणी येणार हे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?

लहान मुलाचा खून अन् ५ संशयित

‘द बकिंघम मर्डर्स’चा ( The Buckingham Murders ) २ मिनिट ३४ सेकंदाचा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. एका अल्पवयीन मुलाच्या खूनाचा तपास करण्यासाठी करीनाची नियुक्ती करण्यात येते. यात तिच्यासमोर एकूण ५ संशयित असतात. १४ नोव्हेंबरच्या रात्री नेमकं कोण कुठे होतं याचा शोध तिला घ्यायचा होता. ट्रेलरमध्ये सुरुवातीला करीना पहिल्या संशयिताची चौकशी करत असल्याचं पाहायला मिळतं. ‘द बकिंघम मर्डर्स’चा ट्रेलर सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे.

The Buckingham Murders

करीना तिच्या २५ वर्षांच्या कारकि‍र्दीमध्ये आता निर्माती म्हणून एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘क्रू’ चित्रपटानंतर, अभिनेत्री पुन्हा एकदा एकता कपूरसोबत काम करत आहे. ‘द बकिंघम मर्डर्स’ हा चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी त्यांनी ‘सिटीलाइट’, ‘स्कॅम १९९२’, ‘स्कूप’ अशा प्रोजेक्टची जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा : IC-814: The Kandahar Hijack: कंदहार हायजॅक वेबसीरीजमध्ये अतिरेक्यांची हिंदू नावे; वाद उफाळल्यानंतर नेटफ्लिक्सनं दिलं उत्तर

‘द बकिंघम मर्डर्स’ ( The Buckingham Murders ) ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘द बकिंघम मर्डर्स’ हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, ऐश टंडन, रणवीर ब्रार आणि कीथ एलनसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. हा चित्रपट हंसल मेहता दिग्दर्शित असून असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कर यांनी लिहिलेला आहे.