‘द दिल्ली फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आगामी चित्रपटाची शूटिंग कशी चालली आहे याची झलक त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांनी सेटवरील बिहाइंड द सीन (BTS) व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना त्यांच्या टीमच्या मेहनतीचे कौतुक केले. यासह प्रत्येक फ्रेम, कथा आणि तपशील आजवर न सांगितले गेलेले सत्य समोर आणेल असे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक अग्निहोत्री यांनी व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन लिहिले, “प्रत्येक फ्रेम, प्रत्येक कथा आणि तपशीलातून हिंदू नरसंहाराच्या आजवर न सांगितल्या गेलेल्या सत्याला समोर आणण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असून समर्पणाने काम करत आहे.”

हेही वाचा… Video : “हजारों जवाबों में खामोशी अच्छी…”, दिलजीत दोसांझने लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केले डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मरण; म्हणाला…

‘द दिल्ली फाइल्स’चा BTS व्हिडीओ

व्हिडीओत चित्रपटाच्या सेटवरील गंभीर वातावरण पाहायला मिळते. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री प्रचंड समर्पणाने टीमबरोबर काम करताना दिसतात. चित्रपटातील अभिनेते आणि टीम आपापल्या भूमिका निभावताना आणि चित्रपटाला वास्तवात उतरवण्यासाठी मेहनत करताना दिसतात. विवेक यांनी पुढे लिहिले, “‘द दिल्ली फाइल्स’ हा फक्त एक चित्रपट नसून आजवर ज्यांचा आवाज दाबला गेला त्यांना आवाज देण्याचं हे मिशन आहे.”

हेही वाचा…Video : आशा भोसले यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी ‘तौबा तौबा’ गाणे गात धरला ठेका, केली विकी कौशलची प्रसिद्ध हूकस्टेप

चित्रपटाची रिलीज डेट

‘द दिल्ली फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री असून अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट तेज नारायण अग्रवाल आणि ‘आय एम बुद्धा प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली सादर केला जाईल. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The delhi files vivek agnihotri shares behind the scenes glimpses of the upcoming film psg