The Diary of West Bengal Director Goes Missing: ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या वादग्रस्त चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा कोलकातामधून बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. मिश्रा यांना कोलकाता पोलिसांनी त्यांच्या चित्रपटाशी संबंधित चौकशीसाठी बोलावले होते. पण ते शहरात आल्यापासून त्याचा फोन बंद आहे, त्यामुळे कुणाचाच त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद सुरू झाला. चित्रपटात पश्चिम बंगालमधील हिंसाचार दाखवण्यात आला आहे, त्यामुळे या चित्रपटाला काही ठिकाणी विरोध होतोय. त्याचबरोबर सनोज मिश्रा यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. चित्रपटामुळे राज्याची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. न्यूज १८ ने याबद्दल वृत्त दिलंय.

Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

रक्त खवळतंय, हँग द रेपिस्ट; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप, पोस्ट चर्चेत

सनोज मिश्रांचे कुटुंबीय चिंतेत

सनोज मिश्रा अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंबीय खूप चिंतेत आहे. या चित्रपटामुळे धमक्या येत होत्या, त्याच प्रकरणात सनोज मिश्रा बेपत्ता झाले आहेत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यांची पत्नी द्विती मिश्रा यांनी एबीपी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत पतीबद्दल चिंता व्यक्त केली. कोलकाता पोलिसांनी बोलावल्यानंतर सनोज १४ ऑगस्टच्या सकाळी घरातून निघाले. मिश्रा यांनी दुपारी फोन करणार असं सांगितलं होतं, पण कोलकात्याला गेल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असं द्विती यांनी म्हटलंय.

“मला नेहमी सचिनची बायको म्हणतात…”, सुप्रिया पिळगांवकर यांचं वक्तव्य; जया ‘अमिताभ’ बच्चन वादाबद्दल म्हणाल्या…

द्विती मिश्रा यांनी सांगितलं की सनोज यांना शेवटचं त्यांच्या पुतण्याने पाहिलं होतं. तो सनोज यांना सकाळी साडेसात वाजता विमानतळावर सोडायला गेला होता. मिश्रा सकाळी ९ वाजता कोलकात्यासाठी निघणार होते. पण ते कोलकात्यात गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. दिवसभर फोनची वाट पाहिली, पण त्यांच्याबद्दल काहीच कळालं नाही, त्यामुळे त्यांनी संध्याकाळी पोलिसांत धाव घेतली.

कुठे आहे ‘मोहरा’तील ही अभिनेत्री? १८ वर्षांनी साध्वीच्या रुपात दिसली अन्…; आता करते ‘हे’ काम

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टच्या संध्याकाळी कोलकाता येथील एका मंदिराजवळ सनोज मिश्रा यांचा फोन काही काळासाठी चालू होता, पण नंतर अगदी काही वेळातच तो बंद झाला. त्यानंतर त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळू शकलेली नाही. पतीचा जीव धोक्यात असल्याची भीता असल्याने द्विती यांनी गोमती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ हा चित्रपट ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या पोलीस सनोज मिश्रा यांचा शोध घेत आहेत.