विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या यशानंतर विकीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी ओपनिंग करेल, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आकडेवारीनुसार पहिल्याच दिवशी चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. तर आता पहिल्या वीकेंडची सुरुवातही फारशी चांगली झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ने पहिल्या दिवशी १.४० कोटी रुपयांची कमाई केली. तर सॅकनिकच्या रिपोर्टनुसारआता दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने १.८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात विकी कौशल व मानुषी चिल्लर ही दोघेही प्रमुख भूमिकेत आहेत.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…

आणखी वाचा : गौर गोपाल दास यांना दीक्षा घेण्याआधी आवरता आला नाही ‘पीयूष’ प्यायचा मोह; जाणून घ्या ‘पीयूष’ या पेयाचा इतिहास

दोन दिवसांनी मिळून या चित्रपटाने ३.२ कोटींची कमाई केली आहे. विकीच्या या चित्रपटाबरोबरच शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ हा चित्रपटही प्रदरक्षिती झाला. त्यानेही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवलेली नाही. एकूणच शाहरुख खानच्या ‘जवान’ची हवा अजूनही कायम असल्यानेच या दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर त्याचा परिणाम झाला असल्याचं दिसून येत आहे.

‘द ग्रेट इंडियन फॅमिली’मध्ये विकीने भजन कुमार नावाची भूमिका साकारली आहे. “या चित्रपटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा चित्रपट संपल्यानंतर, प्रेक्षक त्यांच्या कुटुंबासह चेहऱ्यावर हास्य घेऊन त्यांच्या घरी परत जातील. मी पहिल्यांदा चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हाही माझ्याही त्याच भावना होत्या,” असं विकी एका मुलाखतीत म्हणाला होता.

Story img Loader