आज बॉलिवूडधे सलमान, आमिर शाहरुख, अक्षय हे सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते मानले जातात. अभिनेत्रींनमध्येदेखील दीपिका पदुकोण, करीना कपूर या अभिनेत्री महागड्या अभिनेत्री आहेत. अभिनेत्यांना मिळणाऱ्या मानधनाबाबत दिग्दर्शक सुभाष घई यांनी टीका केली होती. चित्रपटात काम करणाऱ्या स्टार्सची किंमत १०० कोटी पण दिग्दर्शकाला मिळणाऱ्या मानधनाबद्दल कुणीच भाष्य करत नाही असं म्हणत त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीवर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक अग्निहोत्री आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून कायमच आपली मतं मांडत असतात. ते असं म्हणाले की, ‘तुमचं अगदी बरोबर आहे सुभाष घई, इंडस्ट्रीमध्ये लेखक, दिग्दर्शक यांना कधीच आदर मिळत नाही. करोना महामारीनंतर जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यातील किती लेखक दिग्दर्शक पुढे आले? बरेच चित्रपट माहिती देखील नाहीत.’

जिनिलियाला ‘हा’ गुजराती पदार्थ आवडतो; मुलाखतीदरम्यान रितेश देशमुखने केला खुलासा

विवेक अग्निहोत्री बॉलिवूडवर टीका टिपणी करताना ते देशातील सामाजिक घटनांवरदेखील भाष्य करत असतात. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या कांतारा चित्रपटाचे आणि त्याच्या लेखक दिग्दर्शकाचे त्यांनी कौतुक केले होते.

‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटावर काम करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचा खुलासा केला होता. दरम्यान, या सीरिजचा विषय कोणता, त्यात कोणते अभिनेते असणार, ती केव्हा प्रदर्शित होणार याविषयी कोणताही खुलासा अद्याप केलं गेलेला नाही.

Story img Loader