‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने विवेक अग्निहोत्री हे नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला टीकेचा सामना करावा लागला होता, मात्र प्रेक्षकांनी चित्रपटगृहात चित्रपट बघण्यासाठी गर्दी केली होती. या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री हे नाव चर्चेत आलं आहे. बॉलिवूडच्या घराणेशाही असो किंवा ऑस्कर पुरस्कारांवरून टीका असो, विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकतीच त्यांच्याबाबतीत एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुंबईत त्यांनी एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज मुंबईत घर घेणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. प्रत्येक माणसाचे आज स्वप्न असते मुंबईत छोटं का होईना आपले एक घर असावे. विवेक अग्निहोत्री यांनी मुंबईतील प्रतिष्ठित अशा वर्सोवा भागात फ्लॅट घेतला आहे. माहितीनुसार Ecstasy Realty यांच्याकडून विवेक अग्निहोत्री यांनी हा फ्लॅट विकत घेतला आहे. ज्या इमारतीत त्यांनी फ्लॅट घेतला आहे, ती इमारत ३० मजली असणार आहे. ३२५८ चौरस फूट क्षेत्रफळ इतका परिसर त्यांना मिळणार आहे त्याचबरोबरीने ३ गाड्या पार्क होतील अशी सोय त्यामध्ये असणार आहे. १७.९२ कोटी इतकी किंमत या फ्लॅटची असणार आहे.

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली ‘मोठी’ घोषणा

नुकतीच विवेक अग्निहोत्री त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी आपल्या घर घेण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. १.७ कोटी रुपये त्यांनी स्टॅम्प ड्युटीसाठी भरले आहेत. Indextap.com या वेबसाईटच्या मदतीने त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे. या इमारतीत एका चौरस फूट क्षेत्रफळाची किंमत ५५,००० रुपये इतकी आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी या परिसरात राहतात. नुकतेच शाहिद कपूरने वरळी परिसरात घर घेतले आहे.

‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटावर काम करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचा खुलासा केला होता. दरम्यान, या सीरिजचा विषय कोणता, त्यात कोणते अभिनेते असणार, ती केव्हा प्रदर्शित होणार याविषयी कोणताही खुलासा अद्याप केलं गेलेला नाही.