Oscar Awards 2023 : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठी फारच खास होता. ऑस्कर २०२३ साठी आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे.
संगीतकार एमएम किरवानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’चा पुरस्कार स्वीकारताना किरावानी म्हणाले, “मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे”. किरवानी यांचं स्टोजवर स्पीच सुरू असताना दीपिका पदुकोण भावूक झाली होती. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि सामान्य लोक सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
आणखी वाचा : नेपोटीजमबद्दलच्या जुन्या वक्तव्यामुळे सोनम कपूर होतीये ट्रोल; राजकुमार रावबरोबरचा व्हिडिओ व्हायरल
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीदेखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणतात, “ऑस्कर मिळाल्याबद्दल एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांचे मनापासून अभिनंदन, तुमचा अभिमान आहे. तसंच ‘द एलिफेंट व्हीस्पररर्स’ या माहितीपटाला सर्वोत्तम ऑस्कर मिळाल्याबद्दल कार्तिकी गोन्सालवीस आणि गुनीत मोंगा यांचे मनापासून अभिनंदन. हे वर्षं भारतीय चित्रपटांचं आहे.”
इतकंच नाही तर ‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना विवेक यांनी स्वतःच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “ही भारतीय चित्रपटांसाठी अगदी योग्य वेळ आहे. याची सुरुवात आमच्या ‘द काश्मीर फाइल्स’ने झाली, नंतर पाठोपाठ ‘आरआरआर’ला घवघवीत यश मिळालं. आता त्यातील गाण्याला आणि एका भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाला आहे, शिवाय दीपिका पदूकोणही या ऑस्कर सोहळ्यात भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.”
यंदाच्या ऑस्करसाठी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’चीसुद्धा चर्चा होत होती. बऱ्याच लोकांना या चित्रपटाला नमांकन मिळेल अशी शक्यता वाटत होती. गेल्यावर्षी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक अद्भुत इतिहास रचला. आता विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.