‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाल्यावर पुढे अवघ्या १८ दिवसांमध्ये या सिनेमाने २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. अभिनेत्री अदा शर्मासाठी हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला, मात्र अलीकडेच घडलेल्या एका घटनेमुळे अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शाहिद कपूरच्या बहुचर्चित ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार रिलीज

अदा शर्मा एकीकडे ‘द केरला स्टोरी’चे यश साजरे करत असतानाच दुसरीकडे तिला सोशल मीडियावर वेगवेगळ्या धमक्या येत आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने अदा शर्माच्या फोन क्रमांकाचे तपशील लीक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर या युजरने एक पोस्ट व्हायरल करीत अदाला फोन नंबर लीक करायची धमकीसुद्धा दिली आहे. संबंधित युजरने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याची दखल घेतली आहे.

हेही वाचा : बॉलीवूडचा कोणता सेलिब्रिटी रणबीरच्या लेकीला चांगलं सांभाळेल? अभिनेता म्हणाला, “हा सुपरस्टार राहासाठी परफेक्ट…”

पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर, अदा शर्माला फोन नंबर लीक करण्याची धमकी देणाऱ्या इन्स्टाग्राम युजरने तात्काळ पोस्ट डिलीट करीत त्याचे अकाउंट बंद केले. अकाउंट बंद केल्यावरसुद्धा युजरने केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत अदा शर्माने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या पोलीस संबंधित युजरचा आणि या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा : “तू खोटारडी आहेस…” सान्या मल्होत्राने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “शाहरुखबरोबर जवानमध्ये…”

‘द केरला स्टोरी’ चित्रपटात हिंदू मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून नंतर दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील करण्याचा कट रचला गेला, असा दावा दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. चित्रपटाच्या या कथानकामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. आतापर्यंत या चित्रपटातील बहुतांश कलाकारांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story actress adah sharma contact details get leaked insta user threatens to reveal her phone number sva 00