‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘द केरला स्टोरी’मध्ये अदाने शालिनी उन्नीकृष्णन ही मुख्य भूमिका साकारली होती. यापूर्वी अदाने अनेक हिंदी, तमीळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अभिनेत्रीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. चित्रपटाने अवघ्या १८ दिवसांमध्ये २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केल्याने अदाने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये महिला कलाकारांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीबाबत भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : शुभमन-साराचा ब्रेकअप? इन्स्टाग्रावर केले अनफॉलो; गिलचा ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री अदा शर्माने अलीकडेच सिद्धार्थ कन्नन यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यादरम्यान अदा म्हणाली, “मला या इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगले लोक भेटले. जर तुमचा दिग्दर्शक चांगला असेल, तर तुम्ही कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करू शकता. इंडस्ट्रीमध्ये काम करताना चांगले-वाईट दोन्ही लोक मला भेटले. महिला कलाकारांनी समान मानधनाच्या मागणीपूर्वी सर्वप्रथम बॉलीवूडमधील लैंगिक भेदभावाबाबत भाष्य केले पाहिजे.”

हेही वाचा : आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्या पत्नीने दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “माझी फसवणूक…”

अदा पुढे म्हणाली, “शूटिंगसाठी आधी हिरॉईनला सेटवर बोलवतात, मग खूप वेळ थांबवतात. सर्व चौकशी करून हिरोचा मॅनेजर सेटवर येतो. त्यानंतर हिरोचे आगमन होते, परंतु या सगळ्यात हिरॉईन खूप आधीपासून सेटवर उपस्थित असते याकडे कोणीही पाहत नाही. हा भेदभाव बॉलीवूडमध्ये प्रकर्षाने जाणवला. अशा वातावरणात काम करायला मला अजिबात आवडत नाही.”

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या यशानंतर अदा शर्मा लवकरच मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ‘द गेम ऑफ गिरगिट’या चित्रपटातून ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.