‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु दुसरीकडे मात्र सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी जादुई आकडा गाठत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर आता हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी वाटचाल करत आहे.
हेही वाचा : “जय श्री राम…” ‘आदिपुरुष’मधील पहिलं गाणं पाहून प्रेक्षक भारावले; अजय-अतुलच्या संगीताने पुन्हा केली कमाल!
‘द केरला स्टोरी’चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाने १४ दिवसांत एकूण १७१.७२ कोटींचा व्यवसाय केला असून शुक्रवारी १५ व्या दिवशी ६ कोटींचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश आले. यामुळे चित्रपटाचे १५ दिवसांचे एकूण कलेक्शन १७७.७२ कोटींवर गेले आहे. आता हा चित्रपट हळूहळू २०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल करत असून यंदाच्या वीकेंडला ‘द केरला स्टोरी’बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये काय कमाल दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून या चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदीही घालण्यात आली आहे. तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपट कोटींची कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह-जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. यामुळे देशभरात या चित्रपटावरून वाद सुरू झाला होता, तर काहींनी चित्रपटाचे कौतुकही केले. या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाला असून २०२३ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरला स्टोरी’ हा १०० कोटींची कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा : “तुझ्या आयुष्यात महत्त्वाचे कोण?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत विकी कौशलने शेअर केला ‘तो’ फोटो
शाहरुख खानचा ‘पठाण’, रणबीरचा ‘तू झुठी में मक्कार’ आणि सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानंतर कोणताही नावाजलेला स्टार नसलेल्या ‘द केरला स्टोरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.