बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु, असं असतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड करत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या १२ दिवसांतच ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला आहे.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून या चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदीही घालण्यात आली आहे. तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपट कोटींची कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. आता चित्रपटाच्या १२व्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले होते.
हेही वाचा>> अमोल कोल्हेंच्या नाटकाला सुप्रिया सुळेंची हजेरी, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “शिवपुत्र संभाजी…”
मीडिया रिपोर्टनुसार, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने १२व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ९.८० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने १५० कोटींची आकडा पार केला असून आत्तापर्यंत १५६.८४ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा>> अनन्या पांडे व आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या चर्चांबाबत रणबीर कपूरचा खुलासा, म्हणाला, “त्याला एक मुलगी…”
‘द केरला स्टोरी’ चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.