The Kerala Story Box Office Collection day 3: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून वादात सापडला होता. काही राजकीय पक्ष व संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. पण कोर्टाने त्यास नकार दिला व चित्रपट सगळीकडे रिलीज झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाई करत आहे. वीकेंडला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तिसऱ्या दिवशीही ‘द केरला स्टोरी’ने चांगला गल्ला जमवला आहे.

हेही वाचा – ‘द केरला स्टोरी’मधील व्हिलन ‘आसिफा’ खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; चित्रपटासाठी घेतलं ‘एवढं’ मानधन

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Beed sarpanch murder case Walmik Karad charged under MCOCA in Marathi
Walmik Karad MCOCA : मोठी बातमी! वाल्मिक कराडवर मकोका; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Lucknow Auto Driver Murder case
Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले

अदा शर्मा स्टारर चित्रपट ‘द केरल स्टोरी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारी या चित्रपटाने सुमारे १६.५० कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. वादात सापडलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ३५.७५ कोटींची कमाई केली आहे. दररोज चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटी आणि दुसऱ्या दिवशी जवळपास १२ कोटींचा गल्ला जमवला होता.

हेही वाचा – “या नेत्यांना…” महाराष्ट्रात ‘द केरला स्टोरी’ मोफत दाखवणाऱ्यांबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले

तामिळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगलं प्रदर्शन केलं. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. ही राज्यातील बेपत्ता झालेल्या ३२ हजार महिलांची कहाणी आहे, असा दावा आधी निर्मात्यांनी केला होता. मात्र, वाढता वाद पाहता या चित्रपटात केवळ ३ महिलांची कथा असल्याचे निर्मात्यांनी सांगितले तसेच आधीचे टीझरही युट्यूबवरून हटवले होते.

Story img Loader