The Kerala Story Box Office Collection day 4: ‘द केरला स्टोरी’ संदर्भात वाद सुरूच आहे, पण तरीही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. वीकेंडला चांगला गल्ला जमवणाऱ्या चित्रपटाने सोमवारीही प्रेक्षकांना थिएटर्समध्ये खेचून आणलं. चार दिवसांतच चित्रपट ५० कोटींच्या जवळ पोहोचला आहे. चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘द केरला स्टोरी’च्या क्रू मेंबरला धमकी, दिग्दर्शकाची मुंबई पोलिसांत धाव

My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
Sachin Pilgaonkar ashok saraf starr navra maza navsacha 2 release on amazon prime
५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
star pravah lagnachi bedi serial will off air
‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटी आणि दुसऱ्या दिवशी जवळपास १२ कोटी रुपये कमावले होते. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने सुमारे १६.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता चौथ्या दिवसांच्या आकडेवारीनुसार चित्रपटाने १०.५० कोटी रुपये कमावले आहेत. रविवारपेक्षा कमाईत घट झाली असली तरी सोमवार पाहता आकडे चांगले आहेत. अशा रितीने चार दिवसांत चित्रपटाने ४५.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

शबाना आझमींनी ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणाऱ्यांना सुनावले खडे बोल; ‘लाल सिंग चड्ढा’चा उल्लेख करत म्हणाल्या…

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ आज ९ मे रोजी ५० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल. एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, दुसरीकडे यावरून वादही सुरू आहे. तमिळनाडूनंतर पश्चिम बंगालमध्येही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीन चित्रपट स्क्रीनवरून हटवण्याचे आदेश दिले.