‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईपर्यंत याची सातत्याने चर्चा सुरु आहे. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर विविध मतही मांडले जात आहेत. अनेक कलाकार या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १२ कोटी रुपये कमावले होते. त्याबरोबरच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने सुमारे १६.५० कोटी, तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने १०.५० कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या पाचव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.
आणखी वाचा : ‘वेड’ चित्रपटातील बालकलाकार खुशीबरोबर सायली संजीवचे नशीब उजळले, म्हणाली “हा फोटो…”

मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने पाचव्या दिवशी ११ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पाच दिवसात चित्रपटाने ५६. ७२ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात हा चित्रपट अजून चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’मध्ये व्हिलनची भूमिका का निवडली? अभिनेत्री म्हणाली, “मी स्वत: हा निर्णय…”

दरम्यान, सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली होती, याचे वास्तव चित्रण दाखवण्यात आले आहे. केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, दुसरीकडे यावरून वादही सुरू आहे. तमिळनाडूनंतर पश्चिम बंगालमध्येही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीन चित्रपट स्क्रीनवरून हटवण्याचे आदेश दिले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story box office collection day 5 sudipto sen adah sharma film hits rs 50 crore in india nrp