‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटावरून बराच वाद सुरू होता. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हा चित्रपट लवकरच कमाईचा १०० कोटींचा आकडा गाठणार आहे.

या चित्रपटात ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा खोटा आहे, हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण तसं जरी असलं तरीही या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात मोठी कमाई केली आहे.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

आणखी वाचा : पहिल्या दिवशी ७.५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ बनवण्यासाठी आला मोठा खर्च, चित्रपटाच्या बजेटचा आकडा समोर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी १२ कोटींचा गल्ला जमवला. तर या चित्रपटाने सहाव्या दिवशीदेखील १२ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत या कमाईच्या आकडेवारीमध्ये फरक पडलेला नाही. तर त्याआधी या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटी, दुसऱ्या दिवशी ११.१२ कोटी, तिसऱ्या दिवशी १६.४० कोटी, चौथ्या दिवशी १०.७ कोटी आणि पाचव्या दिवशी ११.१४ कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई ही ८० कोटींपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे आता येत्या एक-दोन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल असा सर्वांना विश्वास वाटत आहे.

हेही वाचा : “ज्यांना हा चित्रपट प्रोपगंडा वाटतो ते…,” ‘द केरला स्टोरी’च्या वादावर अनुपम खेर यांनी मांडले परखड मत

सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री प्रमुख भूमिकांत आहेत.