‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. आधी तमिळनाडूमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर सोमवारी पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही चित्रपट थिएटर्समधून हटवण्याचे आदेश दिले. अशातच आता चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकीचा मेसेज आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकीचा मेसेज आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘The Kerala Story’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘एएनआय’ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पोलिसांना माहिती दिली की क्रू मेंबर्सपैकी एकाला अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. “मेसेजमध्ये त्या व्यक्तीला घरातून एकटं बाहेर न पडण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी केरला स्टोरी लोकांना दाखवून काहीही चांगले केले नाही, असा उल्लेख मेसेजमध्ये होता,” असं पोलिसांनी सांगितलं.

शबाना आझमींनी ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणाऱ्यांना सुनावले खडे बोल; ‘लाल सिंग चड्ढा’चा उल्लेख करत म्हणाल्या…

पोलिसांनी क्रू मेंबरला सुरक्षा पुरवली आहे, पण अद्याप लेखी तक्रार न मिळाल्याने एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. दरम्यान, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने 8 मे रोजी राज्यात शांतता राखण्यासाठी, राज्यात द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली. या बंदीबाबत प्रतिक्रिया देताना चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह म्हणाले “जर राज्य सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर आम्ही कायदेशीर मार्ग शोधू. आम्ही जो काही मार्ग काढू तो कायदेशीर सल्ल्यावर आधारित असेल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story crew member receives threat message mumbai police provides security hrc
Show comments