गेल्या काही दिवसांपासून ‘द केरला स्टोरी’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळूनही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुदीप्तो सेन यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- तरुणीने सलमान खानला घातली लग्नाची मागणी; भाईजान म्हणाला “माझे लग्नाचे…”

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीप्तो सेन यांची सततच्या प्रवासामुळे तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच चित्रपटाचे प्रमोशनही थांबवण्यात आले असून अनेक दौरेही रद्द करण्यात आले आहेत. सुदीप्तो सेन यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर १० शहरांमध्ये ‘द केरला स्टोरी’चा प्रचार करण्याची योजना आखली आहे.

हेही वाचा- “हा इस्लाम नाही…” ‘द केरला स्टोरी’फेम अभिनेत्री योगिता बिहानीचं मोठं वक्तव्य

सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल शाह निर्मित, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगालमधील चित्रपटावरील बंदी हटवण्यात आली आहे. हा चित्रपट आता पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात २१६.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने २५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.