गेले काही दिवस विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. गोव्यातील चित्रपट महोत्सवात या चित्रपटावर नदाव लॅपिड या ज्युरी मेंबरने केलेल्या टिप्पणीमुळे देशातील वातावरण चांगलंच ढवळलं गेलं. लॅपिड यांच्या वक्तव्यावर बऱ्याच लोकांनी त्यांचं मत मांडलं. याच चित्रपपट महोत्सवात ज्यूरींपैकी सुदीप्तो सेन यांनीदेखील लॅपिड यांचं हे वक्तव्य वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता याबद्दल पुन्हा सुदीप्तो यांनी वक्तव्य केलं आहे.

सुदीप्तोसुद्धा यांनीही या चित्रपट महोत्सवात ज्युरी म्हणून सहभाग घेतला होता. लॅपिड यांच्या या वक्तव्यावर पुन्हा टिप्पणी करत हे वक्तव्य अनैतिक असल्याचं सुदीप्तो यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय ज्या चित्रपटाला पुरस्कारही मिळाला नाही त्याबद्दल अशाप्रकारे वक्तव्य करणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
twinkle khanna on saif ali khan attack kareena kapoor
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरवर टीका करणाऱ्यांवर भडकली ट्विंकल खन्ना; म्हणाली, “पुरुषांबरोबर घडणाऱ्या प्रत्येक…”

आणखी वाचा : ‘अवतार २’ बघताना प्रेक्षकांनी टॉयलेटला कधी जावं? दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचं भन्नाट उत्तर

‘एएनआय’शी संवाद साधताना सुदीप्तो म्हणाले, “ज्युरी बोर्डाने केवळ पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांवरच टिप्पणी करणं योग्य आहे. ज्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही त्याबद्दल आम्ही बोलत नाही. जर आमच्यापैकी कोणत्या ज्युरीने असं केलं असेल तर माझ्यामते ते अनैतिक आहे. आमच्याकडे एकूण २२ चित्रपट आले आणि आम्ही ते सगळे पाहून त्यापैकी ५ चित्रपटांना पुरस्कार दिले, विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट हा त्या १७ चित्रपटांपैकी एक होता ज्याला पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे केवळ त्याबद्दलच अशी टिप्पणी करणं हे अनैतिक आहे.”

लॅपिड यांच्या त्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण चित्रपट महोत्सवाला गालबोट लागलं असंही सेन म्हणाले. नुकताच सुदीप्तो यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपटही अशाच एका वादग्रस्त घटनेवर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader