‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या चित्रपटावर होत असलेल्या वादामुळे सोशल मीडियावर चर्चेला नवा विषय मिळाला असून केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे अनेक भागांत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर याउलट काही भागांत हा चित्रपट टॅक्स-फ्री करण्यात आला आहे. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : सोनाक्षीने अखेर वडिलांची ‘ती’ इच्छा केली पूर्ण; म्हणाली, “मी त्यांना फोटो पाठवला अन्…”
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत ५० कोटींचा गल्ला जमवला असून चित्रपटाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे वाटले होते का? असा प्रश्न केला असता ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिग्दर्शक सुदीप्तो सेन म्हणाले, “मला एका गोष्टीचे समाधान वाटते की, केरळमधील महिलांचे प्रश्न, दहशतवाद, धर्मांतर, त्यांच्या समस्या या सगळ्या गोष्टी ‘द केरला स्टोरी’मुळे देशासमोर आल्या आहेत. आज लोक धर्मांतरबंदी लागू करण्याची मागणी करत आहेत. मला एक दिग्दर्शक म्हणून आनंद होतोय की, आमचा जो मूळ उद्देश होता तो सफल झाला.”
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणाऱ्यांवर अनुराग कश्यप संतापले म्हणाले, “काही आक्षेपार्ह असो वा नसो…”
सोशल मीडियावर देशातील सामान्य जनतेने या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला, चित्रपटाबाबत सांगण्यासाठी काही लोकांनी तुम्हाला पर्सनल मेसेजसुद्धा केले का? यावर दिग्दर्शक सुदीप्तो सेन पुढे म्हणाले, “तुम्ही कदाचित अंदाजही बांधू शकत नाही, एवढ्या लोकांचे मला पर्सनल मेसेज आले. यामध्ये केरळमधील एका मुस्लीम मुलीचाही मेसेज होता. तिने सुरुवातीला असंख्य बदनामीकारक मेसेज केले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी तिने पुन्हा इन्स्टाग्रामवर मेसेज केला. तेव्हा ही मुलगी म्हणाली, ‘मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. तुम्ही अगदी चांगले काम केले आहे.’ सांगायचे तात्पर्य असे की, जे लोक आम्हाला शिव्या देत होते, या चित्रपटाला अजेंडा असे संबोधत होते त्या लोकांचा दृष्टिकोन चित्रपट पाहून आता बदलला आहे.”