सध्या बॉलीवूडमध्ये आणि छोट्या पडद्यावर लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री वृशिका मेहताने लग्न केलं. तर मुक्ती मोहन व कुणाल ठाकूरनेही लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने गुपचूप लग्न उरकलं आहे. ‘द केरला स्टोरी’ व ‘शेरशाह’ या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता प्रणय पचौरी लग्नबंधनात अडकला आहे.

प्रणय पचौरीने स्क्रीन रायटर सहज मैनीशी लग्नगाठ बांधली. दोघांनी ९ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमधील कसौली इथं कुटुंबीय व मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. फोटोंमध्ये प्रणयने सुंदर शेरवानी घातली होती. त्याच्या डोक्यावर लाल फेटा आणि गळ्यात मोत्यांचा हार होता. तर, सहजने पेस्टल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

प्रणय व सहज यांच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते व सेलिब्रिटी कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. अदा शर्मा, निती टेलर, शिवांग चोप्रा, रिद्धिमा पंडित यांनी नवविवाहित जोडप्याला सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.