‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. लव्हजिहादच्या जाळ्यात अडकून दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या मुलींच्या सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही होत आहे.
‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अदा शर्माने अवघ्या १६व्या वर्षी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. २००८ साली विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून तिने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. तिने अनेक हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. अदाने २०१४ साली ‘हार्ट अटॅक’ चित्रपटातून तेलुगु सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘सन ऑफ सत्यमूर्ती’, ‘राणा विक्रम’, ‘सुब्रमण्यम फॉर सेल’ या चित्रपटांत ती झळकली आहे.
हेही वाचा>> “१५ लोकांनी महिनाभर रोज बलात्कार…”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य, म्हणाली, “प्रेमात…”
अदा शर्माने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारबरोबरही काम केलं आहे. तब्बल १५ वर्ष मनोरंजनविश्वात काम केल्यानंतर अदाला ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामुळे तिला रातोरात स्टार बनवलं. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासाठी अदाने घेतलेल्या मानधनाचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटासाठी अदाने मोठी रक्कम आकारली आहे. अदा शर्माने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासाठी तब्बल एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
सुप्दीतो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट तगडी कमाई करत आहे. अवघ्या १३ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६५.९४ कोटींची कमाई केली आहे.