‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. वादाच्या भोवऱ्यात सापडूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं आहे. या चित्रपटात निमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता बिहाणीने तिच्या बाबतीत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

हेही वाचा- Video : “माझ्या सगळ्या गाड्यांचे नंबर…” श्रद्धा कपूरने पापाराझींबरोबर साधला मराठीत संवाद, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”

नुकतीच तिने ‘जनसत्ता’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे. योगिता म्हणाली, ” जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा मला या सर्व गोष्टींची माहिती नव्हती. कास्टिंग काउचसारखे काही तरी आहे याची मला कल्पना नव्हती. मी खूप सरळ होते. जेव्हा मला एखाद्या प्रोजेक्टसाठी फोन यायचा तेव्हा माझ्या एक-दोन वर्षं आधी अभिनय करणारे माझे मित्र होते. मी त्याला मेसेज करायचे आणि त्याच्याकडून जाणून घ्यायचे की असा एक टीव्ही शो आहे आणि ऑडिशन आहे का? ते खरे आहे की नाही हे मी नेहमी तपासून पाहायची.”

योगिता पुढे म्हणाली, “एकदा मला एका प्रोजेक्टच्या संदर्भात बोलावण्यात आल्याचे आठवते. चित्रपटासंदर्भात करार करायचा होता. यासाठी त्याने मला कुठल्या तरी हॉटेलमध्ये बोलावले. पण मी मीटिंगसाठी कोणत्याही हॉटेलमध्ये जाणार नाही, असा माझा नियम होता. त्याला हे आधी माहीत होते पण तो म्हणाला की फक्त करारावर सही करायची आहे. मी माझ्या मित्राबरोबर तिथे गेले. तो दुसऱ्या टेबलावर बसला होता. मी त्याच्याबरोबर वेगळ्या टेबलावर बसून बोलत होतो.

हेही वाचा- दीपिका पदुकोणने पतीला केले ट्रोल; इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहसाठी शेअर केला भन्नाट मीम

“मला त्या वेळी इतकेही समजत नव्हते की, कोणी काही बोलत असेल तर त्याचा अर्थ काय? मी खूप लहान होते. तुम्हाला कोणीही थेट काही सांगत नाही. त्यासाठी ते वेगळे शब्द वापरतात, मला ती व्यक्ती म्हणाली, ‘मी तुझे करियर बनवणार आहे.’ हे वाक्य ऐकून माझ्या मित्राने मला तिथून निघण्यास सांगितले. मी आणि माझा मित्र तिथून निघालो. तो माझा पहिला अनुभव होता. मला कोणीही जबरदस्तीने काहीही करायला सांगितले नाही. जिथे मला सुरक्षित वाटत नाही अशा ठिकाणी मी अजिबात जात नाही.” असे योगिता म्हणाली.