सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा नेहमी चर्चेत असते. अदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. स्वतःचे सुंदर फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. जरी ती अमराठी असली तरीही तिला उत्तम मराठी बोलता येतं. तिला मराठी संस्कृतीबद्दल प्रेम असून अदाला मराठी लोक फार आवडतात. त्यामुळे ती नेहमी सोशल मीडियावर मराठी कविता सादर करत असते. नुकतीच तिने मराठी चाहत्यांसाठी नवी मराठी कविता सादर केली आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – ‘अॅनिमल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचं पोस्टर प्रदर्शित; रणबीर कपूर-रश्मिका मंदाना झळकले लिपलॉक करताना
‘चिडलेली इडली’, ‘चवळी’, ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग’, या कवितांनंतर अदाने आणखी एक मराठी कविता मराठी चाहत्यांसाठी सादर केली आहे. ‘कोंबडीला आला टेलिफोन’ ही कविता अदाने सादर केली आहे. तिचा हा व्हिडीओ मराठी चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडीओला अवघ्या तासाभरात लाखोहून व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलला काय झालं? हॉस्पिटलमध्ये झाली दाखल, सोशल मीडियावर लाइव्ह येऊन म्हणाली…
“लई मस्त कॉमेडी करती गं तू”, “पण मला वांग्याच भरीत पाहिजे”, “खूपच छान यार…खरंच तूच खरी अभिनेत्री आहेत”, “खूप छान कविता ऐकली. सहमत आहे. तुम्ही प्रतिभेची खाण आहात”, “या सर्व गोष्टी तुम्ही आजीबाईंकडून ऐकल्या आहात ना”, “काय भारी आहे”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अदाच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अधिपतीने बायकोचं नाव काय ठेवलं? पाहा
दरम्यान, अदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने तेलुगू आणि हिंदी सिनेसृष्टीत काम केलं आहे. २००८मध्ये तिने ‘१९२०’ या भयपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अदा ‘कमांडो’, ‘हसी तो फसी’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली आहे.