सुदीप्तो सेन दिग्दर्शक असलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे तिला नवी ओळख मिळाली. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अनेकदा तिला प्रेक्षकांनी मराठी कविता म्हणतानाही ऐकलं आहे. आता तिला मराठी शिवीही येते असा खुलासा तिने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते. तिचे हे व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच आवडले. याचबरोबर तिचे अनेक मराठी मित्र मैत्रिणीही आहेत. इतकंच नाही तर तिला मराठी शिव्याही कळतात.

आणखी वाचा : “महाराष्ट्रात जन्मलात, वाढलात तर मराठी…,” ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचं भाषेबद्दलचं वक्तव्य चर्चेत

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी शिवी देत नाही. पण मला मराठीतील एक शिवी माहित आहे आणि ती म्हणजे बावळट. मी आतापर्यंत हा शब्द कधी कोणाला उल्लेखून वापरलेला नाही. पण तो माझ्या शब्दसंग्रहात आहे. त्यामुळे मी तो लक्षात ठेवेन आणि माझ्या आयुष्यात अनेक बावळट आहेत त्यांच्याशी मी ही मुलाखत झाल्यावर नक्कीच बोलेन.” अदा शर्माचं हे बोलणं आता चांगला चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे ‘या’ मराठी पदार्थाच्या प्रेमात, खुलासा करत म्हणाली…

दरम्यान, तिच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. तर या चित्रपटाने चांगली कमाई ही केली. त्यानंतर आता अदा कोणत्या चित्रपटात दिसणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story fame adah sharma revealed the she knows marathi bad words rnv