अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटातील अभिनयासाठी अदा शर्माचे विशेष कौतुक करण्यात आले, परंतु करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्रीला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. अदाने याबाबत एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

हेही वाचा : “नमस्ते दर्शको…” कोणी केली सारा अली खानची हुबेहूब नक्कल?; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून अभिनेत्री म्हणाली…

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Actress Amrita Subhash makes her directorial debut with a play
दिग्दर्शिका…झाले मी!

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताना अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली, “काही वर्षांपूर्वी अनेकांनी मला नाकाची सर्जरी करून घे, म्हणजे तुझे नाक आणखी चांगले दिसेल असा सल्ला दिला होता, परंतु कालांतराने सर्वांना माझे नाक आवडू लागले. आता माझे नाक इतरांसाठी चिंतेचा विषय नाही कारण, आता मी अनेक चित्रपट केले आहेत.”

हेही वाचा : ‘चुकीला माफी नाही’ नाट्यगृहात मोबाईल वापरणाऱ्या प्रेक्षकांना अमृता सुभाषने स्पष्टच सांगितले; म्हणाली, “कित्येकदा नाटक मध्येच…”

‘द केरला स्टोरी’विषयी बोलताना अदाने सांगितले, या दिवसांत मी अनेक तरुण मुलींना भेटले आहे. “मी भेटलेल्या बहुतांश मुलींनी आमचा चित्रपट ४ ते ५ वेळा पाहिलेला असतो. चित्रपटातील काही दृश्य, डॉयलॉग मुलींना अगदी बरोबर लक्षात राहिले आहेत. याचा मला आनंद आहे.”

हेही वाचा : कतरिना कैफने चित्रपटाचे कौतुक केल्यावर विकी कौशल झाला रोमॅंटिक; पत्नीसाठी शेअर केली खास पोस्ट

अदा शर्माबद्दल सांगायचे तर, ‘द केरला स्टोरी’ चित्रपट केल्यानंतर तिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. अनेक चित्रपट निर्माते त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये अदाची निवड करण्याचा विचार करत आहेत. अभिनेत्री लवकरच ‘कमांडो ४’ मध्ये अभिनेता विद्युत जामवालसह काम करणार आहे. याशिवाय ‘द गेम ऑफ गिरगिट’ चित्रपटात अदा शर्मा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबरोबर मुख्य भूमिकेत दिसेल.

Story img Loader