‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून ओळख मिळालेली अभिनेत्री अदा शर्माची तब्येत अचानक बिघडली असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली आहे. त्यामुळे तिला डायरियाचा त्रास होत होता. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून डॉक्टर तिच्यावर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- श्रद्धा कपूरला गुडघ्यावर बसत चाहत्याने केलं प्रपोज; व्हिडीओ बघून नेटकरी म्हणाले, “हिच्या बापाला…”
IANS दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारीच अदाला त्रास सुरु झाला होता. तिला उलट्या आणि जुलाबचा त्रास होत होता. अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात तिच्या अनेक चाचण्यात करण्यात आल्या आहेत. अतिसार आणि फुड ऍलर्जीमुळे तिची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान डॉक्टरांच्या देखरेखीखाली अदावर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा-
अदाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर तिचा ‘द केरला स्टोरी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता अदा लवकरच ‘कमांडो’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कमांडो’मध्ये अदाबरोबर श्रिया सिंग चौधरी, इश्तियाक खान , मुकेश छाबरा वैभव तत्ववादी, तिग्मांशु धुलिया आणि अमित सियाल, यांच्याही मुख्य भूमिका आहेत.