काश्मिरी पंडितांच्या समस्येवर आधारित चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ सध्या प्रचंड गाजला. या चित्रपटात १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची कथा दाखवण्यात आली आहे. आता यानंतर ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट येत आहे. विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून आज अखेर ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर प्रदर्शित होतच काहीच मिनिटात हा टीझर लाखो लोकांनी पाहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Video: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नृत्य सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांची स्टेजवर दगडफेक

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली असून सुदिप्तो सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट दहशतवादी संघटनेनं केलेल्या महिलांच्या तस्करीची सत्यता सांगत आहे. या चित्रपटाच्या साध्या पण हृदयद्रावक टीझरमध्ये एका महिलेची कहाणी पाहायला मिळते. ही भूमिका अदा शर्मा साकारताना दिसत आहे.

या मुलीचे नर्स बनण्याचे स्वप्न असते. परंतु तिचे घरातून अपहरण करण्यात येते आणि तिचे धर्मांतर करून तिला आयएसआयएस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद केले जाते. एका सामान्य मुलीला दहशतवादी बनवण्यात येतं. ती एकटीच नव्हे तर अशा ३२,००० महिलांना तेथे आणून दहशतवादी बनवण्यात आलं आहे असा खुलासा ती टीझरमध्ये करत आहे.

हेही वाचा : ‘द कश्मीर फाईल्स’नंतर आता येणार ‘द केरळ स्टोरी’; चित्रपटाच्या माध्यमातून धर्मांतरावर करणार भाष्य, टीझर प्रदर्शित

२००९ पासून केरळ आणि बंगळुरूमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील सुमारे ३२,००० मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश सिरिया, अफगाणिस्तान आणि इतर आयएसआयएस अशा भागात आहेत. या महिलांची वेदनादायक आणि सत्य कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story film teaser got released rnv