‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाची कथा काही महिलांची आहे, ज्यांना धर्मांतराद्वारे मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले. चित्रपट गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर तो काल प्रदर्शित झाला. हा चित्रपट तयार करण्यासाठी मोठा खर्च केला गेला आहे.

या चित्रपटातील ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. पण या चित्रपटाला पहिल्या दिवशी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ७.५ कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी साडेसात कोटी कमावणारा हा चित्रपट तयार करण्यासाठी किती खर्च आला हा आकडा आता समोर आला आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील ‘या’ १० दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम खर्च केली आहे. फक्त चित्रपटाच्या निर्मितीवर नाही, तर कलाकारांनाही चांगलं मानधन मिळालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट ४० कोटी खर्च करून बनवला आहे. तर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा हिने सर्वाधिक मानधन आकारले आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी तिने १ कोटी फी घेतली. तर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या तीन अभिनेत्रींनी ३०-३० लाख रुपये मानधन घेतलं.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’मध्ये मोठा बदल! ३२००० च्या ऐवजी ‘इतकी’ दाखवणार धर्मांतर केलेल्या महिलांची संख्या

सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. आता हा चित्रपट ऑफिसवर कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.