‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ८ मे रोजी सोमवारी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले, तर त्याच्या दोन दिवसांपूर्वी तमिळनाडूमध्येही चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात आलं. त्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटावरील बंदी हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
‘द केरला स्टोरी’च्या क्रू मेंबरला धमकी, दिग्दर्शकाची मुंबई पोलिसांत धाव
‘द केरळ स्टोरी’च्या निर्मात्यांनी पश्चिम बंगालमधील चित्रपटावरील बंदी हटवण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निर्मात्यांनी त्यांच्या याचिकेद्वारे तमिळनाडू सरकारला राज्यभरातील चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. तामिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटगृहात हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. पण काही ठिकाणी हा चित्रपट दाखवला जात आहे, त्यांना सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी निर्मात्यांची मागणी आहे.
‘The Kerala Story’ ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम, चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
‘द केरला स्टोरी’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, “आधी ते काश्मीर फाईल्स घेऊन आले होते, आता ही केरळची कहाणी आहे आणि नंतर बंगाल फाईल्सची योजना आखत आहेत. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? केरला स्टोरी हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.”
दरम्यान, चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांनी बंदी हटवण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालय काय निर्णय देईल, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.