The Kerala Story Review : ईस्कॉनचे गुरू आणि प्रसिद्ध भारतीय सनातनी संत अमोघ लीला प्रभू यांनी यूट्यूबवरील एका पॉडकास्टमध्ये कलियुगाबद्दल फार मस्त माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, “कलियुग १८ फेब्रुवारी ३१०२ बीसी या दिवशी सुरू झाले आहे, आत्तापर्यंत जवळपास ५००० वर्षं पूर्ण झाली आहेत तर कलियुग संपायला ४,२७,००० वर्षं आणखी बाकी आहेत. ही कलियुगाची सुरुवात आहे, त्यामुळेच आपल्याला लोक एवढे धार्मिक झालेले पाहायला मिळत आहेत. या कलियुगातील ही १०००० सुवर्ण वर्षं आहेत. या १०००० वर्षांत प्रत्येक जण परमेश्वराचा जप, आराधना करतो आणि त्याला अध्यात्माची प्रचंड ओढ लागते. सध्या हाच काळ सुरू आहे.”

आज ‘द केरला स्टोरी’ बघताना ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली की हो आपण याच कलियुगाचा एक हिस्सा आहोत, असे वाटण्यामागील कारण म्हणजे चित्रपटाकडे बघायचा बदललेला लोकांचा दृष्टिकोन. मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट, चांगली कथा असलेले चित्रपट याकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली असून ‘द केरला स्टोरी’साठी लोकांनी सकाळच्या शोसाठी गर्दी करणे यावरून आपण एक समाज म्हणून नेमके कोणत्या दिशेने चाललो आहोत याचा अंदाज येतो. चित्रपट नेमका कसा आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण लीला प्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे धर्माच्या बाबतीत संवेदनशील झालेल्या लोकांची ‘द केरळ स्टोरी’सारख्या चित्रपटाला होणारी गर्दी हे आपल्याला नकळपणे सांगून जाते की प्रेक्षकांना आता फक्त मनोरंजन नकोय. तर त्याबरोबरच भरपूर कॉन्ट्रोवर्सी, धार्मिक डोस आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांना हव्या आहेत तरच ते तिकीटबारीवर गर्दी करतात.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Mumbai woman lost rupees 6 lakhs
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा

आणखी वाचा : Maharashtra Shaheer Review : पूर्वार्ध खेचलेला, पण उत्तरार्धात प्रेक्षकांवर पकड घेणारा ‘महाराष्ट्र शाहीर’ नेमका कसा आहे? जाणून घ्या

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे झाल तर ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणे यालाही सामान्य लोकांचा उदंड प्रतिसाद मिळेल पण ‘द काश्मीर फाइल्स’ने प्रेक्षकांच्या काळजाला जसा हात घातला होता तेवढे या चित्रपटाला यश मिळणे मला तरी कठीण वाटतेय. चित्रपट या ‘ISIS Brides’च्या बाजूने स्टॅण्ड घेतो का, अशी मनात भीती होती, पण तसे काही या चित्रपटात नाही. या चित्रपटाचा स्टॅण्ड हा अत्यंत स्पष्ट आहे. केरळ, मेंगलोरमधील मुलींच्या ब्रेनवॉशबद्दल, तिथे सुरू असलेल्या धर्मांतरणाच्या मोहिमेबद्दल, धार्मिक कट्टरतेबद्दल, लव्ह जिहादबद्दल हा चित्रपट अत्यंत स्पष्टपणे त्यांची बाजू मांडतो. पण याचे नाटकीय रूपांतरण थोडे जास्त प्रमाणावर झाल्याने तो तितका आपल्याला भिडत नाही. केरळमधील तीन हिंदू मुलींच्या सत्यघटनेवर हा चित्रपट बेतलेला आहे, ज्यांना पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून आयसीसमध्ये भरती करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या तीन मुलींचे पुढे काय झाले हे या चित्रपटात मांडले आहे. इतकेच नाही तर याचे पुरावेदेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे असे काही घडलेच नव्हते हे म्हणायला काहीच वाव नाहीये.

तर या चित्रपटावरून एवढा गदारोळ माजण्याचे कारण या चित्रपटाच्या एका सीनमध्येच दडले आहे, जिथे केरळ पोलीस यासाठी पुराव्यांची मागणी करतात. याच बाबतीत हा चित्रपट फसला आणि ३२००० महिलांच्या आकड्यावरून वादात अडकला. चित्रपटात जे मुद्दे, तथ्य आणि नंबर्स मांडण्यात आले आहेत त्या संदर्भात एकही पुरावा उपलब्ध नसल्याने एकंदर हा गोंधळ निर्माण झाला आहे. हे पुरावे आणि त्यामागील तथ्य नीट शोधून एक ठोस स्टेटमेंट करण्यात हा चित्रपट कमी पडतो. याबरोबरच ISIS ची ऑपरेशन्स शिवाय इराण, सीरिया, अफगाणिस्तान, बलुचिस्तानमधील या ठिकाणच्या समस्या, मुजाहिदीन लोकांचे क्रौर्य आणि त्यामागचा इतिहास म्हणावा तसा विस्तृतपणे दाखवण्यात आलेला नाही. मुलींच्या ब्रेनवॉशिंग आणि धर्मांतरणाबरोबरच हा मुद्दादेखील तितक्याच गांभीर्याने दाखवणे गरजेचे होते. त्याबाबतीत मात्र काही ठिकाणी हा चित्रपट आपल्याला हास्यास्पद वाटू शकतो.

या दोन गोष्टी प्रामुख्याने सोडल्या तर बाकी चित्रपट उत्तम आहे. गीतांजली, शालिनी अन् निमा या तीन मैत्रिणींची कहाणी ज्या पद्धतीने आपल्यासमोर सादर केली आहे ती नक्कीच तुम्हाला अस्वस्थ करते. मुलींच्या या ब्रेनवॉश प्रक्रियेत सामील असलेली त्यांची मुस्लीम मैत्रीण आसिफा हे पात्र मात्र मला फार हास्यास्पद वाटले. म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच तिचे धर्माबद्दल ज्ञान पाजळणे, अल्लाह हाच एकमेव कर्ता-धर्ता आहे हे सतत बिंबवणे हे थोडे कमी दाखवले असते किंवा एका वेगळ्या पद्धतीने दाखवले असते तर त्याचे गांभीर्य आणखी अंगावर आले असते. बाकी इतरही सहकलाकारांची कामे छान झाली आहेत. खासकरून अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इडनानी यांची कामे लक्षात ठेवण्यासारखी आहेत.

आधी म्हटले त्याप्रमाणे केरळमधील लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाची समस्या फार बारकाईने दाखवण्यात आली आहे. ‘शरियत’ कायद्याच्या अधीन गेलेल्या मुली आपल्याच घरच्यांना ‘काफिर’ म्हणून हिणवतात अन् यामागील भयावह वास्तव समोर आल्यावर त्याच घरच्यांचा आसरा घेतात, ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. याबरोबरच चित्रपटाच्या शेवटी मुख्य पात्र शालिनी आणि तिच्या आईमधील फोनवरचे संभाषण तुम्हाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. याबरोबरच चित्रपटाचे संगीत, चित्रीकरणही ठीकठाक आहे. पटकथादेखील थोडी विस्कळीत आहे, पण एकूणच हा मुद्दा आणि ही कथाच इतकी वादग्रस्त आहे की या इतर गोष्टींकडे कानाडोळा करता येतो. बाकी सुदीप्तो सेन यांचे दिग्दर्शन आणि संवाद ठीकठाक आहेत.

आणखी वाचा : Ghar Banduk Biryani Review : गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय; ‘घर बंदूक बिरयानी’ कसा आहे? जाणून घ्या

काही प्रमाणात हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे, पण ‘द काश्मीर फाइल्स’ पाहून ज्या प्रकारे लोक ढसढसा रडत होते तसे या चित्रपटाच्या बाबतीत पाहायला मिळणे कठीण आहे. चित्रपटात केले गेलेले दावे, पुराव्यांचा अभाव, अपुरे संशोधन आणि गरजेपेक्षा जास्त व्यावसायिक घटक चित्रपटात आल्याने हा चित्रपट तितका मनाला भिडत नाही. नक्कीच याच्या माध्यमातून केरळ, मेंगलोरमधील त्या भयावह घटनांवर चर्चा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ धर्माच्या चष्म्यातून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये असे मनापासून वाटते.