सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतरण केलेल्या चार महिलांची आहे ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटासाठी गर्दी केल्याचे ठीकठिकाणी बघायला मिळत आहे. राजकीय संघटनांनीही यात सहभाग घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घातली गेली आहे, तर देशातील काही प्रदेशांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेण्डबद्दल मधुर भांडारकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “सुशांतच्या मृत्यूनंतर…”

‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार ‘द केरला स्टोरी’ची टीम लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. चित्रपट टॅक्स फ्री करण्याबरोबरच याच्या कथेबद्दलही या भेटीत चर्चा केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संपूर्ण कॅबिनेटबरोबर हा चित्रपट बघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले, “उत्तर प्रदेशची जनता हा चित्रपट बघू इच्छिते की कशा रीतीने त्यांच्या लोकांना यातना सहन कराव्या लागल्या. आम्ही चित्रपट बघू आणि मग त्यावर निर्णय घेऊ.”

या चित्रपटाला होणारी गर्दी बघता भारतातील बऱ्याच राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटात केलेल्या ३२००० महिलांच्या दाव्यावरुन चांगलाच गहजब झाला होता. असे आश्वासन निर्मात्याने उच्च न्यायालयाला दिले होते. या चित्रपटात अदा शर्मा या अभिनेत्रीने मुख्य भूमिका निभावली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story movie team is going to meet cm of uttar pradesh yogi adityanath avn
Show comments