विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं होतं. टीझरपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला पण तरीही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली. यापाठोपाठ विपुल शहा आणि सुदीप्तो सेन यांनी मध्यंतरी नव्या चित्रपटाची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही जोडी आता ‘बस्तर’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मध्यंतरी याचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. याबरोबरच यातही ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार असून चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. आता मात्र ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच ‘बस्तर’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

आणखी वाचा : पती विपुल शाह यांच्या ‘द केरला स्टोरी’विषयी शेफाली शाह यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “ही धर्माची गोष्ट…”

या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच निर्माते विपुल अमृतलाल शाह यांना धमक्या यायला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मात्र या धमक्या वाढल्या असल्याने विपुल यांची आणि त्यांच्या घराची सुरक्षा वाढवल्याचं स्पष्ट होत आहे.अद्याप विपुल शाह यांनी पोलिसांकडे धाव घेतली नसली तरी हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यांनी सरकारी सुरक्षेची मागणी करावी असेही सल्ले त्यांना देण्यात येत आहेत.

या चित्रपटाचं चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच सुरू झालं आहे. याच्या पोस्टरवरुन हा चित्रपट नक्षलवाद आणि कम्युनिस्ट विचारधारेवर भाष्य करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. ‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेनच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘बस्तर’ पुढील वर्षी म्हणजेच ५ एप्रिल २०२४ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. ‘द केरला स्टोरी’च्याच टीमच्या या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story producer vipul shah gets life threats for his upcoming film bastar avn
Show comments