सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ १५ दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. एकीकडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे तर दुसरीकडे या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगामधील या चित्रपटावरील बंदी उठवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Cannes 2023 : “डोरेमॉनची बहिण वाटतेय…” उर्वशी रौतेला ट्रोल, नेटकरी म्हणाले “ऋषभ पंत…”

चित्रपटाला मिळणाऱ्या भरघोस यशानंतर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. चित्रपटाच्या कमाईतून ५१ लाख रुपये ‘अर्श विद्या समाज आश्रमा’ला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अर्श विद्या समाज आश्रम’ धर्मांतरणातून वाचलेल्यांची काळजी घेते. निर्मात्यांनी आश्रमातील २६ मुलींना चित्रपटाच्या कलाकारांसह मीडियाशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले होते.

हेही वाचा- “मी खूप स्वार्थी होतो, नेहमी तिच्याशी…”; पहिल्या प्रेमाबाबत नवाजुद्दीन सिद्दिकीचा मोठा खुलासा, म्हणाला…

पश्चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरील बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. तसंच, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्याची असल्याचे सांगून पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारचे कान टोचले आहेत. तर, दुसरीकडे या चित्रपटातील टीझरनुसार ३२ हजार महिलांच्या धर्मांतरणाच्या आकड्याबाबत अधिकृत माहिती नसेल तर हा चित्रपट काल्पनिक असल्याचे जाहीर करा. तसे डिस्क्लेमर चित्रपट स्क्रीनिंगच्या आधी लावण्याचे निर्देशही देण्यात आले. दरम्यान, भाषणस्वातंत्र्य असले तरीही एखाद्या समुदायाला बदनाम करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही, असंही न्यायाधीशांनी पुढे नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story producers donate the 51 lacks rupees to arsh vidya samaj ashram dpj